पणजी पोलिसांनी केली कारवाई
प्रतिनिधी /पणजी
पणजी पोलिसांनी मोबाईल चोरटय़ा विरेधात केलेल्या कारवाईत 15 महागडे मोबाईल जप्त केले असून चार संशयितांना अटक केली आहे. संशय़ितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. जप्त केलेल्या मोबाईलांची एकूण किमंत 2 लाख 40 हजार इतकी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये मंजूनाथ परशुराम जाधव (धारवाड कर्नाटका), महेश सत्ताप्पा काळे, रोहित सिताराम जाधव, इशा रंगाप्पा भोई (तीघेही हुबळी कर्नाटक येथील) येथील कदंबा बसस्थानकावर एका अज्ञात चोरटय़ांने आपला महागडा मोबाईल चोरल्याची तक्रार कुंदन मिश्रीलाल सॉ (उत्तर प्रदेश) यांनी पणजी पोलीस स्थानकात सोमवार 2 रोजी दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात चोरटय़ा विरेधात 379 कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.
तपास कामाला सुरुवात केली असता मंजूनाथ हा संशयित पोलासांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडे तीन मोबाईल मिळाले होते. नंतर त्याची कसून उलट तपासणी केली असता इतर तीघांचा ठावठिकाणा मिळाला आणि त्यांनाही ताब्यात घेण्यात आले त्यांच्यकडून 12 मोबाईल जप्त केले आहेत. या संशयितांना आणखिन मोबाईल चोरले आणि ते कुठे ठेवले असतील काय याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
आठ दिवसात दिड कोटीचे मोबाईल जप्त
कळंगूट हणजूणा पोलिसांनी मोबाईल चोरटय़ांविरेधात धडक कारवाई केली असून 25 डिसंबर ते 1 जानेवारी या कालावधीत 148 महागडे मोबाईल व इतर सामान मिळून सुमारे दिड कोटी रुपये किमंतीचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण 58 संशय़ितांना अटक केली आहे. नविन वर्षाच्या स्वगतासाठी राज्यातील किमारी भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते याची जाणीव असलेले परप्रांतीय चोरटे पर्यटक बनून गोव्यात आले होते. संदीचा फायदा घेऊन त्यांनी हात साफ करायला सुरुवात केली होती मात्र उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांच्या नेतृत्वा खाली कळंगूट व हणजूणा पोलिसांनी बेधडक कारवाई केली व चोरटय़ांचा बेत हाणून पाडला. अटक पेलेले सर्व संशयित पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान म्हापसा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे दीड लाख किमंतीचे सहा मोबाईल जप्त केले असून एका संशयिताला अटकही केली आहे. संशयिताचे नाव सद्धगी हुसेन अझीज (29, उत्तर प्रदेश) असे आहे. त्याच्या विरोधात आपीसी 379 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.









