जत, प्रतिनिधी
Sangli Crime News : जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चार आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.आरोपींना न्यायालयासमोर आणल्याची बातमी समजताच जत कोर्टासमोर ताड समर्थक तसेच बघ्यांची प्रचंड गर्दी निर्माण झाली होती. यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता.दरम्यान,कोर्टाने संशयित आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात कोठडीकडे रवानगी करत असताना न्यायालयाच्या आवारात थांबलेल्या एका अज्ञात कार्यकर्त्यांने रागाच्या भरात न्यायालयाच्या समोरच बांगड्या फोडून या निर्घृण हत्येचा निषेध करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेऊन जत पोलीस ठाण्यात नेले. यामुळे काही वेळ वातावरण तंग झाले होते.पोलिसांनी आरोपींना कोर्टासमोरून बाहेर काढल्यानंतर संबंधित तरुणाला सोडून देण्यात आले.
जत पालिकेचे भाजप माजी नगरसेवक विजय ताड यांची (दि.17) मार्च रोजी सांगोला रोडवरील अल्फोंसा स्कूल येथे गावठी पिस्तूल मधून गोळ्या झाडून व दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला होता. हा खून कोणत्या कारणातून झाला याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते, तसेच आरोपीच्या मुसक्या आवळणे देखील पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.जिल्हा पोलीस प्रमुख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला होता.
रविवारी रात्री उशिरा या खून प्रकरणी चार संशयित आरोपींना कर्नाटकातील गोकाक येथून ताब्यात घेण्यात आले होते .त्यानंतर सोमवारी सकाळी पोलीस प्रमुखांनी पत्रकार बैठक घेत चारही आरोपींची नावे निष्पन्न करून यात मुख्य सूत्रधार म्हणून माजी नगरसेवक उमेश सावंत यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले.त्यानंतर आरोपी संदीप उर्फ बबलू चव्हाण,किरण चव्हाण,आकाश व्हणकांडे तिघेही रा.जत तर निकेश उर्फ दाद्या मदने राहणार कसबे डिग्रज ता.मिरज जि.सांगली यांना जत न्यायालयासमोर उभे केले असता कोर्टाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.याप्रकरणी आरोपींच्या वतीने जत येथील वकील ए. जी. रेऊर व सुप्रभा महाजन यांनीही काम पाहिले.तर सरकारी वकील म्हणून डी.डी.पाटील यांनी काम पाहिले.
मुख्य सूत्रधारास अटक करा विक्रम सावंत यांची विधानसभेत मागणी
जत तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून कोसारी येथे दुहेरी खून झाला होता. त्यानंतर भर दिवसा माजी नगरसेवक विजय ताड यांचा गोळ्या घालून व दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली असून, मुख्य सूत्रधाराला अटक करून खोलवर चौकशी करण्याची मागणी आमदार विक्रम सावंत यांनी विधानसभेत केली.
जत तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर
जत तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कोसारी येथे दोन खून झाल्यानंतर जत येथे माजी नगरसेवक विजय ताड यांचा भर दिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी.येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर बनल्याच्या गोष्टीकडेही महादेव जानकर यांनी लक्ष वेधले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









