वागणुकीत सुधारणा झाल्याने सरकारचा आदेश
बेळगाव :
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील चार कैद्यांची वागणुकीत सुधारणा झाल्यामुळे शनिवारी सुटका करण्यात आली. राज्य सरकारच्या आदेशावरून त्यांची सुटका झाली. कारागृह प्रशासनाच्या शिफारशीवरून सरकार व कारागृह विभागाने सुटकेचा आदेश दिला आहे. साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर यांच्या हस्ते व्ही. प्रशांत, पुरुषोत्तम, महादेव हुलगण्णावर, फैजुल्ला बारगिर या चौघा जणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत भविष्यात उत्तम नागरिक म्हणून जीवन जगण्याचा सल्ला दिला. विविध प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे आजवर तुम्हाला कुटुंबापासून दूर रहावे लागले. समाजापासूनही दूर रहावे लागले. आता कुटुंबीयांचे प्रेम मिळविण्याबरोबरच समाजातही एक आदर्श जीवन जगावे. अहिंसा, समन्वय, शांततेने जीवन जगताना इतरांनाही कायद्याचे धडे द्यावेत. तुमचे भविष्य उज्ज्वल व्हावे, अशी सदिच्छा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी जेलर राजेश धर्मट्टी, बसवराज बजंत्री, रमेश कांबळे, विश्वनाथ असोदे, बी. एस. कडाडी, मल्लिकार्जुन उळ्ळाग•ाr आदी उपस्थित होते.









