पोलीस आयुक्तांनीच दिली माहिती
बेळगाव : विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलीस आयुक्त कार्यालयातील चौघा जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ही कारवाई करण्यात आली आहे. स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात दुचाकीस्वारांना अडवून विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यासंबंधी त्यांच्यावर कारवाई केली जाते. आता पोलीस आयुक्तांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे.









