सातारा :
पोलीस रेकॉर्डवरील ओम बापूराव महानवर (रा. साखरवाडी, ता. फलटण), श्रीय. उर्फ माँटी शरद खताळ (रा. कापडगाव, ता. फलटण) हे दोघे वाढे फाटा येथे देशी पिस्टल विक्रीकरता येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली. त्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सातारा एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की वाढे फाट्यावर पिस्टलची विक्री दुपारी 4 वाजता होणार आहे. यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पथकास सूचना केल्या. पथकाने वाढे फाटा येथे वेण्णा नदीच्या पुलाजवळ सर्व्हीस रोडला रेकॉर्डवरील ओम महानवर हा 70 हजार रुपयांची देशी बनावटीची पिस्टल खिशातून घेवून दुचाकीवरुन आला. त्याच्यासोबत मॉन्टी होता. पिस्टलची विक्री करताना आढळून आले. त्याप्रकरणी ओम महानवर, माँटी खताळ, आकाश संतोष नरुटे (वय 21, रा. कळंब, ता. इंदापूर), तात्या उर्फ सुयश सोमनाथ घोडके (वय 23, रा. कळंब, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून एक देशी पिस्टल, 1 जिवंत काडतूस, 1 दुचाकी, 3 मोबाईल असा सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
ही कारवाई एलसीबीचे एपीआय रोहित फार्णे, पीएसआय विश्वास शिंगाडे, पारितोष दातिर, पोलीस अंमलदार आतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, प्रवीण कांबळे, सनी आवटे, अमोल माने, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, अमित माने, राजू कांबळे, अरुण पाटील, मनोज जाधव, शिवाजी भिसे, राकेश खांडके, अमित झेंडे, अजय जाधव, प्रवीण पवार, धीरज महाडिक, रवी वर्णेकर, वैभव सावंत, स्वप्नील दौड, संकेत निकम यांनी केली.
..








