पलायन करणाऱ्या संशयिताना फिल्मीस्टाईने चेस करीत पकडले
फोंडा : वरचा बाजार फोंडा येथे एका बेकायदा जुगारअ•dयावर धाड टाकून फोंडा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडीओ सद्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. संशयिताना रंगेहाथ पकडताना त्याच्याकडून अंदाजे दीड हजार रूपयांची रोकड, पत्ते, वही, पेन असे साहित्dया जप्त करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे चार वाजण्याचा सुमारास ही कारवाई करण्यात आली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारमळ फोंडा येथील एका बंद दुकानात संशयित पत्त्याच्या जुगार खेळत होते. याप्रकरणी चार संशयिताना अटक केली आहे. फारूख पिरजादे (40, पंडितावाडा), रियाझ मज्जीद सय्यद (31, कोटवाडा-फोंडा), सोहेल सुभाष आकारकर (22, आकारवाडा फोंडा), फैयाज नरारूद्दीन दय्यद (65, वरचा बाजार फोंडा) अशी संशयिताची नावे आहेत. पोलीसांनी पहाटे केलेल्या कारवाईचे व्हीडीओ सद्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या व्हीडीओत एक वयस्क संशयित पोलिसांच्या तावडीतून निसटून पलायन करताना दिसत आहे. पोलिस कॉन्स्टेबलने त्याचा फिल्मीस्टाईलने पाठलाग करून पकडण्यात यश मिळवलेले आहे. हे चित्र पाहताना व्हीडीओ पाहणाऱ्याचीही बरीच करमणूक होताना दिसत आहे. संशयिताकडून रोकड, पेन, वही व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी चारही संशयिताविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे.









