अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे नातेवाईकांना धक्का : प्रवाशांमध्ये हळहळ
मुंबई :
मुंबईत दिवा ते मुंब्रा या स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुंर्ब्यामधील धोकादायक वळणावर दोन धावत्या लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासल्याने 13 प्रवासी ट्रॅकवर पडले. यातील 4 प्रवाशांचा मृत्यु झाला असून अन्य जखमी असून त्यांच्यावर रुगणालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. मात्र हे प्रवासी लोकलमधून पडण्याचे कारण वेगवेगळे सांगण्यात येत आहे.चौकशीअंतीच याबाबतचा अधिकचा अधिकचा तपशील समोर येईल. या अचानक झालेलया अपघाताने मफतांच्या नातेवाईकांना धक्का बसला असून सहप्रवासी आणि शेजारीपाजारी हळहळ व्यक्त करत आहेत.
जखमींवर कळवा आणि मुंब्रयातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळवा रुग्णालयाने दिली. तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या व सहव्या लाईनचा प्लान
मध्य रेल्वेने कल्याणपासून कसाऱ्यापासून तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान केला आहे. तसेच कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या चौथ्या लाईनचाही प्लान केला आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे दादर पासून दिव्यापर्यंत तसेच सीएसएमटी पर्यंत पाचव्या सहाव्या लाईनची प्लानिंग करण्यात आले आहे.
गर्दीत एकमेकांच्या धक्क्याने अपघात : जनसंपर्क अधिकारी
या अपघाताबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिक़ार्यांनी दिलेल्या माहितीमुसार, हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर उभे होते आणि गर्दीत त्यांना एकमेकांचा धक्का लागला. त्यातून त्यांचा तोल ढासळल्याचे समजते. रेल्वे गार्डने या अपघाताची माहिती दिली. लोकलमधील आठ ते नऊ प्रवासी रेल्वे ऊळावर पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर 9.50 च्या सुमारास घटनास्थळी ऊग्णवाहिका पोहोचल्या होत्या. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडलेल्या या घटनेत फूटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ते खाली पडले, असे जनसंपर्क अधिक़ार्याकडून सांगण्यात येत आहे.
घटनेची चौकशी सुरु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंब्रा स्थानकावर सोमवारी सकाळी झालेली घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुर्घटनेत काही प्रवाशांचा मफत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत : मंत्री गिरीश महाजन
दरम्यान, रेल्वे अपघातात मरण पावलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख ऊपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. जखमींना 50 हजार ते 2 लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. त्यांच्या उपचाराचा खर्च हा पूर्णपणे राज्य सरकारकडून करण्यात येईल. ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यांच्याही उपचारांचा खर्च सरकार करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.








