Kolhapur News : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील माळ रानावरील जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या कालव्यात कार आढळून आली असुन, त्यात एक मृतदेह आढळला आहे. गाडीत मृतदेह आढळल्याने परिसतात खळबळ माजली आहे. चार महिन्यापूर्वी गाडी पेटवून कालव्यात टाकल्याची माहिती समोर आली आहे. मोतीराम महादेव रजपूत (वय-62) रा. हुपरी असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घटनास्थाळावरुन मिळालेली माहिती अशी की,
आज सकाळी पोलिसांना एक निनावी फोन आला. काही दिवसापूर्वी कार कालव्यात पडल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर घटनास्थळी सपोनि पंकज गिरी, गणेश खराडे, रावसाहेब हजारे, सत्तापा चव्हाण आदी दाखल झाले . घटनास्थळी कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. तर कारमध्ये एकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला.अधिक तपास पोलीस करत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









