वृत्तसंस्था/ मिसिसिपी
अमेरिकेतील मिसिसिपीचा संपूर्ण परिसर शनिवारी सकाळी गोळीबाराच्या आवाजाने हादरला. लेलँड टाउनमधील मेन स्ट्रीटवर झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 12 जण जखमी झाले. संशयित हल्लेखोर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण शहरात घबराट पसरली होती. लेलँड हायस्कूलच्या मैदानावर आयोजित सामन्यापूर्वी येथे लोक जमले असताना गोळीबाराची ही घटना घडल्याची माहिती महापौर जॉन ली यांनी दिली.









