कोल्हापूर :
जिल्ह्यात शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन वृध्दासह चौघे जण जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. सरवडे (ता. राधानगरी) गावनजीक शेतात शनिवारी सकाळी काम करीत असलेल्या राधा अवधुत पाटील (वय 35), लता कृष्णात मनुगडे (वय 45), ऊक्मिणी किसन पाटील (वय 75) यांच्या मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. तर म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील बळवंत दाजी कांबळे (वय 80) हे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेतात फिरण्यासाठी गेले होते यावेळी त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला करुन, त्यांनाही जखमी केले.








