बेळगाव : भरधाव कार उलटल्याने चौघे जण जखमी झाले. सोमवारी रात्री बिजगर्णी, ता. बेळगावजवळ हा अपघात घडला असून सर्व जखमींना खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. केए 17, डी 9419 क्रमांकाची कार राकसकोपहून बेळगावकडे येत होती. रात्री बिजगर्णीजवळ चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली. चारही जखमींना स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून बेळगावला पाठविले. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी वडगाव परिसरातील असल्याची माहिती मिळाली असून यासंबंधी अधिक तपशील उपलब्ध झाला नाही.
Previous Articleआता शेतकऱ्यांना रिंगरोडची धास्ती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









