वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिलिपिन्समध्ये झालेल्या वयस्करांच्या आशियाई मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे वयस्कर अॅथलिट 86 वर्षीय के. सुब्रमणीयम यांनी चार सुवर्णपदकांची कमाई केली. गेल्या आठवड्यात झालेल्या या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स क्षेत्रात सुब्बू या टोपण नावाने परिचित असलेल्या के. सुब्रमणीयम यांनी चार सुवर्णपदकांची कमाई विविध क्रीडा प्रकारात केली.
85 किलोवरील वजन गटात सुब्रमणीयम यांनी भालाफेक तसेच लांबउडी, उंचउडी आणि तिहेरी उडी या क्रीडा प्रकारामध्ये दर्जेदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. तामिळनाडूमध्ये वास्तव्य असलेल्या सुब्रमणीयम यांनी या स्पर्धेपूर्वी खडतर सराव केला होता. तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन यांनी चार सुवर्णपदके मिळविणाऱ्या सुब्रमणीयम यांचा खास गौरव केला आहे.









