बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात उसळलेल्या तीव्र स्वरूपाच्या लांटा उसळलेल्या आहेत. मुंबईतील जूहू चौपाटीवर उसळलेल्या लाटांमुळे एक मोठा अपघात घडला असून यामध्ये सहा लोकांचा मृत्यु झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने यापुर्वी दिलेल्या ईशाऱ्या नुसार गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्यामुळे कोकण आणि मुंबईतील किनारपट्टीवर ही याचा मोठा परिणाम दिसत आहे. हवामान खात्याच्या ईशाऱ्यानुसार प्रशासनाने मुंबईतील काही चौपाटीवर पर्यटकांना मज्जाव केला होता. त्यातच आज दुपारी जुहू चौपाटीजवळील समुद्रात ६ जण बुडाल्याची धक्कादायक माहीती समोर येत आहे. घटनेची माहीती मिळताच एनडीआरएफचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले असून तर चौघांचा मृत्यु झाला आहे. या संबंधीची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.