सातारा :
पोलीस रेकॉर्डवरील आरोपींकडून सातारा तालुक्यातील व वाई येथील चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दीपक संतोष पाटणे (वय 23, मूळ रा. भोर, जि. पुणे, सध्या रा. खंडाळा, ता. सातारा), आशुतोष उर्फ पप्पू प्रदीप भोसले (वय 27, मूळ रा. बावधन, ता. वाई, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 24 तोळे वजनाचे 23 लाख 4 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या गुह्यातील मास्टर माइंड लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनोर ता. मिरज जि. सांगली) हा पसार झाला आहे.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी लोकेश रावसाहेब सुतार याने घरफोडीचा गुन्हा त्याच्या दोन साथीदार दीपक पाटणे, आशुतोष भोसले यांच्या मदतीने केला आहे. या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी तपास पथकास दिल्या. तपास पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली. पोलीस कोठडीत त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे तसेच वाई व सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीत देखील घरफोडी केल्याचे सांगितले. तपास पथकाने त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे 4 गुन्हे उघड करुन गुन्ह्यात चोरीला गेलेले 23 लाख 4 हजार रुपये किमतीचे 24 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांचळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, हसन तडवी, मुनीर मुल्ला, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, रवी वर्णेकर, पृथ्वीराज जाधव, प्रवीण पवार, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला.








