लष्कर-पोलिसांची संयुक्त मोहीम : शस्त्रs, दारूगोळा जप्त
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांनंतर सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यात बांधलेले चार बंकर्स उद्ध्वस्त केले आहेत. मणिपूर पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. हे बंकर थमनापोकपी आणि सानसाबी गावांच्या सीमेला लागून असलेल्या भागात बांधण्यात आले होते. या बंकर्समधून डोंगरावर राहणारे बंदूकधारी खालच्या भागातील गावांवर हल्ले करत होते. दहशतवाद्यांचे अ•s शोधण्यासाठी लष्कर-पोलिसांची सलग पाच दिवस विशेष मोहीम सुरू होती. सुरक्षा दलाने 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत इंफाळ पूर्व, तेंगनौपाल, यांगियांगपोकपी आणि चुराचंदपूर येथून शस्त्रs आणि दारूगोळा जप्त केला. या मोहीमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मशीन गन, 12 बोअर सिंगल बॅरल गन, 9 एमएम पिस्तूल, ट्यूब लाँचर, स्फोटके, दारूगोळा आदी साहित्यही जप्त करण्यात आले होते.









