ओल्ड गोवा परिसरात दोन मृतदेह : तिसरा मृतदेह मांडवी नदीत तर चौथा आमोणे पुलाखाली
पणजी : ओल्ड गोवा परिसरात दोन मृतदेह आढळे असून त्यातील एक मृतदेह बिर्याणीच्या दुकानात काम करणाऱ्या 25 वर्षीय युवकाचा आहे. दुसरा मृतदेह अन्नपूर्ण रेस्टॉरंटच्या जवळील ओढ्यात सापडला आहे. तसेच तिसरा मृतदेह पणजी मांडवी नदीत तर चौथा मृतदेह आमोणे-डिचोली नदीत आढळून आला आहे. ओल्ड गोवा येथील पहिल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो बिर्याणीच्या दुकानात काम करणारा मिर्झा सोरेन आहे. त्याच्या नातेवाईकांना महिती दिल्यानंतर ते ओल्ड गोवा येथे पोचले असून शवचिकित्सा करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूबाबत कोणतेही संशयास्पद कारण आढळलेले नाही. तसेच त्याला काही दिवसांपूर्वी कावीळ झाली होती आणि दोन दिवसापासून तो जेवलाही नव्हता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज करून ओल्ड गोवा पेलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली आहे.








