हैदराबाद :
तेलंगणातील हैदराबादमध्ये आर्थिक समस्यांमुळे त्रस्त होत एका दांपत्याने प्रथम स्वत:च्या दोन मुलांची हत्या केली आणि मग आत्महत्या केल्याचे समजते. 45 वर्षीय चंद्रशेखर रे•ाr आणि त्यांच्या पत्नी कविता (35 वर्षे), पुत्र विश्वन (10 वर्षे) आणि मुलगी श्रीता (15 वर्षे) यांचे मृतदेह पोलिसांना घरात आढळून आले. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोट मिळाली असून त्यात आर्थिक समस्यांमुळे परिवाराच्या सदस्यांसोबत स्वत:चे आयुष्य संपवित असल्याचे चंद्रशेखर यांनी लिहिले आहे. माझ्याकडे स्वत:चे आयुष्य संपविण्याशिवाय अन्य कुठलाच मार्ग नव्हता. कृपया मला माफ करा, मी बेरोजगार असून मानसिक अन् शारीरिक स्वरुपात पीडित असल्याचे पत्रात चंद्रशेखर यांनी नमूद केले आहे.









