ओटवणे प्रतिनिधी
Four blood donors of the extremely rare ‘B’ negative blood group saved the patient’s life
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा पुढाकर
गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या विकास चौरसिया यांना अत्यंत दूर्मिळ अशा बी निगेटिव्ह रक्तगटाच्या चार रक्तदात्यांची गरज होती.अशावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या चार दूर्मिळ रक्तदात्यांनी क्षणाचाही विलंब न करता बांबोळी गोवा येथे जात रक्तदान करीत या रुग्णाचे प्राण वाचविले.
विकास चौरसिया या पेशंटचे गोव्यात तसे कोणी ओळखीचे नव्हते आणि त्यात त्यांचा दूर्मिळ असा एबी निगेटीव्ह रक्तगट असल्याने त्यांच्या कुटुंबीयासमोर संकटच होते. अशावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे कधीही हाक मारा, ताबडतोब धाऊन येणारे नियमित आॅन काॅल रक्तदाते शिरोड्याचे विरु परब यांचा संपर्क क्रमांक विकास चौरसिया यांची मुलगी स्मिता प्रसाद यांना मिळाला. रक्ताची तातडीची गरज असल्यामुळे आपल्या जन्मदात्या पिताश्रींसाठी ती विरु परब यांच्याशी संपर्कात राहून रक्ताच्या गरजेसाठी वारंवार विनवणी करत होती. त्यानंतर विरु परब यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधून याबाबत नियोजन केले.
त्यानंतर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे खालील नियमित रक्तदाते तथा सदस्य स्वतः विरु परब (शिरोडा), दिपक मुळीक (धाकोरे), राजाराम गावडे (ओटवणे) तसेच प्रशांत मांडे (उभादांडा) या सर्वांनी वेळात वेळ काढून गोवा बांबोळी रक्तपेढी येथे जाऊन अत्यंत दुर्मिळ अशा एबी निगेटीव्ह रक्तगटाचे रक्तदान केले.
कारचालक रक्तमित्र हरेश वराडकर यांचेही मोलाचे सहकार्य.
काल शनिवार असल्याने गोवा बांबुळी रक्तपेढीला हाफ डे असल्यामुळे या सर्वांना योग्य वेळेत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार्या आजगांव भोमवाडी येथीलकारचालक तथा रक्तमित्र हरेश वराडकर यांचाही यात मोलाचा वाटा होता. रक्तमित्र हरेश वराडकर यांनी एक रुपया सुद्धा गाडीभाडे घेतले नाही व आपल्या दातृत्वाची अशीही प्रचिती आणून दिली.