प्रतिनिधी/कोल्हापूर
विहीरीवरीवरील पाण्याच्या मोटर चोरीप्रकरणी करवीर पोलीसांनी चार संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीची मोटर जप्त केली आहे. महादेव नामदेव पाडेकर (वय 33), ओंकार रामदास जाधव (वय 25), अवधूत भगवान जाधव (वय 22) आणि अक्षय संजय नाईक (वय 25 सर्व रा.बाचणी) अशी या संशयितांची नावे आहेत.बाचणी येथील भास्कर विष्णू पाटील यांनी मोटर चोरीची फिर्याद दिली होती.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,बाचणीतील भास्कर पाटील यांची गावातील शिवडीचा माळ येथे शेती आहे. शेतातील विहीरीवर लावलेली सोलरवर चालणारी पाण्याची मोटर अज्ञात चोरटयाने चोरू नेली होती. याबाबत 15 जुलै रोजी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. सहायक फौजदार निवास पवार व पोलीस हेड कॉन्सटेबल प्रशांत पाटील यांनी या गुन्हय़ाचा तपास करुन महादेव पाडेकर, ओंकार जाधव, अवधूत जाधव, आणि अक्षय नाईक यांना अटक केली.
चोरीतील पाण्याची मोटर महादेव नामदेव पाडेकर याच्या घरी मिळाली. मोटर आणि गुन्हय़ात वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त ढरण्यात आली आहे.
हे ही वाचा : विक्रमनगर येथील ज्वेलर्समधील चोरीचा छडा









