संगमेश्वर पोलिसांकडून कारवाई
रत्नागिरी/प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील कसबा शास्त्रीपुल येथे अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी शास्त्रीपुल येथे सापळा लावुन ४ आरोपीना मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे.या कारवाईत आरोपी अजय राजेंद्र काणेकर( ३८ वर्षे) , अक्षरा अजय काणेकर, ( ३६ वर्षे, दोघे रा. असगोली, मधलीवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), मुस्ताक इब्राहिम मुल्लाजी (५६ वर्षे, कसबा शास्त्रीपुल ता. संगमेश्वर), कामील हसन मुल्ला, (४८ वर्षे रा. डिगणी,मोहल्ला ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी) यांना पकडून त्यांच्याकडून रु. ३,००,०००/- किंमतीचा चरस अंमली पदार्थ व मोटारसायकल असे एकूण रु. ३,४०,०००/- रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला.
संशयित आरोपीवर संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गु. रजि. नं. ८६/२०२३, अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब), (ii) (A), २२ (ब), भा.दं.वि.क. ३४ अन्वये दि. ०९/१०/२०२३रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक रत्नगिरी धनजंय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गावीत, सहाय्यक पोलीस फौजदार साळवी, सहाय्यक पोलीस फौजदार कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कामेरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जोयशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोलगे, पोलीस नाईक बरगाले, पोलीस नाईक मनवल, पोलीस नाईक धामणस्कर, पोलीस कॉन्स्टेबल आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल रामपूरे, पोलीस कॉन्स्टेबल वसावे यांनी केलेली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गावीत करीत आहेत.