पुणे / वार्ताहर :
हिंदू राष्ट्रसेनेच्या तुषार हंबीर (Tushar Hambir) याच्यावर ससून रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा पाच जणांच्या टोळक्याने बंदुकीतून गोळी झाडून तसेच हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी पाणमळा परिसरातून बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांच्याकडून गुन्हय़ात वापरलेली पिस्तूल आणि हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहे.
याप्रकरणी सागर हनुमंत ओव्हाळ (22), बालाजी हनुमंत ओव्हाळ (23, दोघेही रा. बनकर कॉलनी, हडपसर), सूरज शेख (19, रा. हरपळे चाळ, हडपसर) आणि सागर आटोळे (21, वडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर त्यांचा एक साथीदार साहिल इनामदार फरार झाला आहे.
अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडी प्रवेश सुरू
याबाबत तुषार नामदेवराव हंबीर (35, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात कट रचणे खुनाचा प्रयत्न, आर्मअॲक्ट, तसे सरकारी कामात अडथळल्या आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.