राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते भूमिपूजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी दिल्लीत भाजप प्रदेश कार्यालयाची पायाभरणी केली. दिल्लीतील पंडित दीनदयाळ मार्गावर 900 चौरस यार्ड जागेवर भाजपचे नवे कार्यालय बांधले जात आहे. हे कार्यालय पाच मजली असून खाली पार्किंग असेल. जवळपास 34 वर्षांपासून दिल्ली भाजपचे कार्यालय 14 पंडित पंत मार्गावरील सरकारी फ्लॅटमध्ये आहे. दिल्लीप्रमाणेच देशाभरातील इतर भाजप कार्यालयांनाही नजिकच्या काळात नवा साज चढणार असल्याचे यावेळी नड्डा यांनी स्पष्ट केले.









