प्रतिभाताई देशपांडे यांच्या जन्मदिनी कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
महिला विद्यालय मंडळाच्या स्थापना दिनानिमित्त दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रतिभाताई देशपांडे यांचा जन्मदिवस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थिनी प्रियांका हुंदरे, डॉ. मृदुला सांगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष भगवानदास कपाडिया होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मधुकर परांजपे, अध्यक्षा डॉ. शोभा शानभाग, सागर पाटणेकर उपस्थित होते. मुख्याध्यापिका कविता परमाणिक यांनी प्रास्ताविक केले. सानिका हणमशेट हिने स्वागत केले. सृष्टी वाणी हिने परिचय तर वृषाली शानभागने अहवाल वाचन केले. दीपा कुलकर्णी व चिन्मयी चौगुला यांनी दहावीचा निकाल वाचला. दहावी परीक्षेत राज्यात तिसरी व शहरात दुसरी आलेली अनिता तलगेरी व शाळेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थी व विषयात प्रथम आलेल्या गुणवंतांचा प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तन्वी मोतेकर हिने आभार मानले.









