मान्यवरांसह सावंतवाडीचे खेमराज सावंत-भोसले उपस्थित राहणार
बेळगाव : साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिन सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वा. संस्थेच्या के. एम. गिरी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील भारती अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सावंतवाडी येथील राजमाता राणी पार्वतीदेवी यांचे नातू खेमराज सावंत-भोसले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. के. ई संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव मधुकर सामंत, आर. बी. देशपांडे, व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू, अशोक शानभाग यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांचा अल्पपरिचय
प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी 1979 मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून रसायन शास्त्र विषयातून पीएचडी मिळविली. त्यांनी अनेक विषयांचे संशोधन केले आहे. त्यांनी आजवर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, राजस्थान येथील सेंट्रल युनिर्व्हसिटी, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ, इंदूर येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले आहे. 150 हून अधिक विषयांवर त्यांनी प्रबंध सादर केले आहेत.









