28 वा स्थापना दिन गुरुवार पेठेतील कॉर्पोरेट कार्यालयात साजरा : मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : लोकमान्य सोसायटीचा 28 वा स्थापना दिन गुरुवार पेठेतील कॉर्पोरेट कार्यालयामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, पंढरी परब, गायत्री काकतकर, डॉ. दामोदर वागळे, सीईओ अभिजीत दीक्षित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी पंढरी परब यांनी प्रास्ताविक करून लोकमान्य सोसायटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा करते, ती अतुलनीय आहे. या दरम्यान ग्राहकांशी असलेले नाते वृद्धींगत झाले आहे, असे सांगितले.सीईओ अभिजीत दीक्षित यांनी को-ऑप. सेक्टर हे कॉर्पोरेट सेक्टरच्या वळणावर जात आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा आमच्या सोसायटीच्या माध्यमातून देत आहोत, असे सांगितले. संचालक गजानन धामणेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. शाखेच्या पहिल्या ठेवीदार गीता ठक्कर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील, कर्मचारी, ग्राहक व ठेवीदार उपस्थित होते. व्यवस्थापक ज्योती रेगे यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









