क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे फौजी इलेव्हन व केबल इलेव्हन संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे फौजी इलेव्हन, ऍडव्होकेट इलेव्हन, पोस्ट इलेव्हन व केबल इलेव्हन यांच्यात टेनिसबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते. पहिल्या सामन्यात फौजी इलेव्हन संघाने पोस्ट इलेव्हन संघाचा पराभव केला तर दुसऱया सामन्यात केबल इलेव्हन संघाने ऍडव्होकेट इलेव्हन संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्याआधी पावसाने हजेरी लावल्याने सामना रद्द करण्यात आला आणि फौजी व केबल इलेव्हन संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. प्रमुख पाहुणे रजनीश, मीना अनिल बेनके, नव्याश्री राव, इंदिरा जानवेकर, शेखर जानवेकर, प्रणय शेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते संयुक्त विजेत्या संघांना गौरविण्यात आले.









