कुडाळ – प्रतिनिधी
मुंबई -गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे – मळावाडी येथे कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या इंडिका व आयटेन कार मध्ये शनिवारी दुपारी अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. इंडिका कार बेळगावी – कर्नाटक येथून राजापूरच्या दिशेने जात होती.यात कारचालकासह चार जण होते,तर आयटेन कार गोव्याहून कणकवलीच्या दिशेनं जात होती.यात कारचालकासह दोघेजण होते. महामार्गावर येथे प्राथमिक शाळेनजीक दोन्हीं कारमध्ये अपघात झाला.दोन्हीं कार भरधाव वेगात होत्या.इंडिका कार दुभाजकावर आदळून कोलांटी घेत साधारण 30 फूट अंतरावर जात सरळ उभी राहिली ,तर आयटेन कार रस्त्याच्या बाहेर सखल भागात 30 ते 35 फूट जात झुडपात पलटी झाली.या कारचा दरवाजा उघडल्याने आतील दोघे सुखरुप बाहेर आले.इंडिका कारचालकाला किरकोळ दुखापत झाली.त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.दोन्हीं कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटना समजताच कुडाळ पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









