Kolhapur Panhala Fort : किल्ले पन्हाळगडावरील तटबंदी पुन्हा ढासळली आहे. राजदिंडी मार्गांवरील तटबंदी आज (ता. २१) पहाटे ढासळली. यामुळे शेजारील बुरुजाला ही त्याचा धोका निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास उर्वरित तटबंदी ढासळण्याची शक्यता आहे. यामुळे गडाखालील वाड्या वस्तीतील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दर पावसाळ्यात किल्ले पन्हाळगडावरील एक बुरुज ढासळतो. तर ठिकठिकाणी तटबंदी ढासळाला लागली आहे. याकडे पुरातत्व विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेकदा गडप्रेमी आणि शिवप्रेमींनी केला आहे. पुरातत्व विभागाला जागे करण्यासाठी काही दिवसापूर्वी राज्यातील गडप्रेमी ऐतिहासिक पन्हाळगडावर हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते. राज्यातून पुणे, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, नागपूर, मुंबईतून हे गडप्रेमी किल्ले पन्हाळगडावर आले होते. पन्हाळगडाचे संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारने गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, तातडीने संवर्धन करून पुरातत्व विभागाने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी केली होती.
Previous Articleगोविंदांच्या आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण; म्हणाले, वेगळं आरक्षण नसून…
Next Article Ratanagiri : राजीवडा खाडीत बोट बुडाली, एकजण बुडाला









