कोल्हापूर :
लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षाच्या मुलासह तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असताना, दुसऱ्या एका फसवणूक प्रकरणात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाच्या वकील पुतण्याला शाहुपूरी पोलिसांनी अटक केली. अॅङ भरत श्रीपाल गाट (वय 52, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (दि. 29) पोलीस कोठडी सुनावली. या फसवणूकीच्या गुह्यातील मुख्य सूत्रधार पूजा अजित भोसले–जोशी (रा. तिसरी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि राहुल रमेश भोसले (रा. उचगाव, ता. करवीर) हे दोघे संशयित अद्यापी पसार आहेत.
निवारा टेस्टामेंटरी ट्रस्टचा माध्यमातून साडेचार ते सहा हजार रुपयांची ठेव पावती करून, 18 महिन्यांत 26 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून, जिह्यातील काही जणांना लाखो ऊपयाला गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण सन 2023 मध्ये उघडकीस आले होते. यावेळी जिह्यात एकच खळबळ उडाली होती. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात मे 2023 मध्ये मुख्य संशयीत पूजा भोसले–जोशी, राहुल भोसले, अॅङ भरत गाट या तिघाविरोधी शाहुपूरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे तिघे संशयित गायब झाले होते. या तिघांचा शोध घेऊनही ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. या तिघा संशयितांपैकी अॅड. भरत गाट याने दोन वेळा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. पण ते दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनअर्ज दाखल केला. उच्च न्यायालयाने सुध्दा त्याचा अटकपूर्व जामिनअर्ज फेटाळून लावल्याने, त्याला तिथेही दिलासा मिळाला नाही. अखेर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन, अटकपूर्व अर्ज दाखल कऊन, जामिनावर सुटका व्हावी, याकरीत प्रयत्न सुऊ केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याने शनिवारी (दि. 25) स्वत:हून शाहूपुरी पोलिसांना शरण येत ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक कऊन, न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अॅङ गाट हा गेल्या पावणेदोन वर्षापासून पसार होता, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी यादव यांनी दिली.








