कीव्ह :
युक्रेनच्या लोकप्रतिनिगृहाचे माजी सभाध्यक्ष आंद्रे पारुबिये यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या एलव्हिव्ह येथे करण्यात आली. या देशाचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हत्येसंबंधात तीव्र संताप व्यक्त केला असून हे निर्घृण कृत्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना युक्रेनची राजधानी कीव्हच्या एलव्हीव्ह या उपनगरात घडली आहे. हा गजबजलेल्या वस्तीचा भाग असून येथे असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पारुबिये यांच्यावर जवळून अनेक गोळ्या झाडण्यात आल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. पारुबिये यांनी युरोमेडन क्रांतीमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. या क्रांतीच्या अंतर्गत युव्रेनमध्ये अनेक उग्र आंदोलने छेडण्यात आली होती. युरोपियन महासंघाने त्या काळात रशियाशी नजीकचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी एक महत्वाचा करार केला होता. तथापि, या कराराला युक्रेनचा तीव्र विरोध होता. हा विरोध प्रदर्शित करण्यासाठी युव्रेनमध्ये प्रचंड जनआंदोलन छेडण्यात आले होते. हेच आंदोलन युरोमेडन या नावाने ओळखले जात होते. आजही युक्रेनमध्ये या आंदोलनाचे महत्व मानले जाते, अशी माहिती देण्यात आली आहे. या आंदोलनाने युक्रेनच्या राष्ट्रीय बाण्याचे दर्शन जगाला घडले होते आणि युरोपियन महासंघालाही नंतर या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करणे भाग पडले होते. या आंदोलनाचे सूत्रसंचालन करणाऱ्यांमध्ये पारुबिये यांचा सहभाग होता. या आंदोलनामुळे त्यांची लोकप्रियता केवळ युव्रेनमध्येच नव्हे, तर युरोपातही मोठ्या प्रमाणात वाढली.









