सावंतवाडी । प्रतिनिधी
डेगवे गावचे माजी सरपंच नागबा (बाबा) डेमा देसाई ( 95) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. डेगवे विकास सोसायटी अध्यक्षपद तसेच देवस्थान उपसमिती उपाध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. गावच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग असे. भारतीय सैन्यातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यात कायम सहभाग घेतला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे , मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा डेगवे माजी सरपंच मंगलदास देसाई यांचे ते वडील होत.









