Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी ट्विटर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी विद्यमान सरकारवर आरोप केले आहेत.देशात जे काही सुरू आहे तो लंडन योजनेचा भाग आहे. या योजनेअंतर्गत मला तुरुंगात टाकण्याचा कट रचला जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
इम्रान खान यांनी व्हिडिओत म्हटलयं की, माझ्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. माझ्या अटकेची तयारी देशाचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात सुरू असलेले सर्व खटले थांबवण्यासाठी, त्यांच्यावरील आरोप हटवण्यासाठी सुरू असलेल्या लंडन योजनेचा भाग आहे.पीटीआय पक्षाला हरवण्याचा आणि नवाज शरीफ यांच्याविरोधातील सर्व प्रकरणं संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी एक विशेष करार झाला आहे. त्यावर माझ्या विरोधकांनी सह्या केल्या आहेत.
Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा- https://twitter.com/ImranKhanPTI/status/1635787080482578432?s=20
काल दुपार पासून पोलीसांनी हल्ला केला आणि लोकांनी नुकसान पोहचवले आहे. पाकिस्तानमधील पोलिसांचा खरा कट हा मला केवळ तुरुंगात टाकण्याचा नव्हे तर त्यांना माझं अपहरण करून हत्या करायची आहे. अटकेची योजना हे केवळ एक नाटक आहे. मला संपवणं हा त्यांचा मुख्य उद्देश असल्य़ाचेही त्यांनी म्हटलयं
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









