ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Devisingh Shekhawat passed away माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
शेखावत यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
शेखावत हे विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशनद्वारे संचलित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमरावतीचे पहिले महापौर होते. 1985-1990 मध्ये ते महाराष्ट्र राज्य विधानसभेतील अमरावती मतदारसंघातून निवडून आले होते. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह 7 जुलै 1965 रोजी झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.








