वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ः व्हॅटिकनच्या प्रवक्त्याकडून निवेदन जारी
व्हॅटिकन सिटी / वृत्तसंस्था
ख्रिश्चन समुदायाचे सर्वात मोठे धार्मिक नेते माजी पोप बेनेडिक्ट यांचे शनिवारी वयाच्या 95 व्या वषी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळाने त्यांची तब्येत खूपच खराब होती. शनिवारी सकाळी 9 वाजून 34 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर व्हॅटिकनमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादरम्यान पोप फ्रान्सिसही उपस्थित राहणार आहेत. बेनेडिक्ट यांच्या निधनानंतर जागतिक पातळीवर शोक व्यक्त केला जात आहे.
व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटिओ ब्रुनी यांनी शनिवारी सकाळी निवेदन जारी करत निधनाची घोषणा केली. “आम्हाला अत्यंत दुःखाने कळवावे लागते की पोप एमेरिटस बेनेडिक्ट (सोळावे) यांचे व्हॅटिकनमध्ये निधन झाले. अधिक माहिती शक्मय तितक्मया लवकर उपलब्ध करून दिली जाईल,’’ असे जाहीर करण्यात आले. पोप एमेरिटस बेनेडिक्ट यांचे मूळचे नाव जोसेफ रॅटझिंगर असे होते. पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते व्हॅटिकन संकुलात असलेल्या मठात राहत होते. त्यांची प्रकृती बऱयाच दिवसांपासून खराब होती. व्हॅटिकनने 28 डिसेंबर रोजी प्रथमच ते अत्यवस्थ असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी जगभरातील ख्रिश्चन बांधवांना पोप बेनेडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते.
सोळावे पोप बेनेडिक्ट यांनी 2013 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. व्हॅटिकन चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात त्यांचा कार्यकाळ सर्वाधिक वादांनी घेरला होता. पद सोडताना त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे केले होते. बेनेडिक्ट यांच्या कार्यकाळात धर्मगुरूंच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बेनेडिक्ट हे 11 फेब्रुवारी 2013 रोजी आपल्या पदावरून पायउतार झाले होते. आठ वर्षे ते या पदावर राहिले आणि यादरम्यान त्यांना अनेक वादांना सामोरे जावे लागले. त्यांच्या राजीनाम्यानंतर पोप फ्रान्सिस यांची सर्वोच्च पदावर वर्णी लावण्यात आली होती.









