Former Police Patil Prabhakar Patade of Chinder passed away
चिंदर गावचे माजी पोलीस पाटील तसेच श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयचे अध्यक्ष, बारापाच मानकरी प्रभाकर सिताराम पाताडे वय वर्ष (८७) यांचे रविवारी सकाळी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.ते चिंदर गावचे पोलिस पाटील म्हणून त्यांनी 35 वर्षे सेवा बजावली होती. तसेच ते जनता विद्यामंदीर त्रिंबकचे माजी संचालकही होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, चुलत भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. चिंदर पोलिस पाटील दिनेश पाताडे यांचे ते काका होत. त्यांच्या निधनाने चिंदर गावामध्ये सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
आचरा / प्रतिनिधी









