Pakistan Ex PM Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे.इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इमरान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरून अटक करून पोलीस गाडीत नेतानाचा व्हिडिओ पीटीआयने ट्वीट केला आहे.ज्याला त्याच्या जीवापेक्षाही तुमच्या स्वातंत्र्याची काळजी आहे त्याच्यासाठी घराबाहेर पडा, असं पीटीआयने म्हटलंय.
इस्लामाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त करताना म्हटलंय की, कोर्टात दाखल होण्याअगोदरच इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधिशांनी 15 मिनिटात इस्लामाबादचे आयजी,गृहसचिव यांना तातडीने बोलवले आहे. जर 15 मिनिटात आयजी आणि गृहसचिव नाही आले तर मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे त्यांनी म्हटलयं.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









