प्योंगयांग
उत्तर कोरियाचे दीर्घकाळापर्यंत औपचारिक राष्ट्रप्रमुख राहिलेले किम योंग नाम यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. किम योंग नाम हे उत्तर कोरियाच्या सुप्रीम पीपल्स असेंबलीच्या प्रेजिडियमचे अध्यक्ष राहिले होते. हे पद देशाच्या नाममात्राच्या राष्ट्रप्रमुखाचे असते. 1998 ते एप्रिल 2019 पर्यंत ते या पदावर राहिले आणि विदेशी नेत्यांसोबतच्या भेटीदरम्यान देशाचे प्रतिनिधित्व करत होते. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली आहे. किम योंग नाम यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.









