शिरोळ प्रतिनिधी लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आपण यापूर्वी प्रयत्न केले होते ही मागणी मान्य होईपर्यंत स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. येथील श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाचया अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे होते, यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की अनिष्ट रूढी, परंपरा या विरोधात त्यांनी जनजागृती करून समता ,बंधुत्व व जातीभेद नष्ट खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वर यांनी करण्यासाठी प्रयत्न केले. महात्मा बसवेश्वरची जयंती साजरी करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम ही समिती करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रारंभी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले उपस्थित यांचे स्वागत मनोजकुमार रणदिवे यांनी केले यावेळी मान्यवरांचा सत्कार समितीचे अध्यक्ष मलगोंडा भुशिंगे ,उपाध्यक्ष प्रकाश माळी, दत्तात्रय कुंभार, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास आलम प्रभू योग पिठाचे परमपूज्य जगद्गुरु बसवकुमार स्वामीजी, माजी आमदार उल्हास पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे पंचंगेचे संचालक बा पाटील, दत्तचे संचालक दरगु गावडे, नीलकंठ फल्ले, सुभाषसिह रजपूत, प्रल्हाद कुंभार विजयसिंह देशमुख, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
बसवेश्वर महाराजांच्या पालखीची मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये रथ, बँड, शरण शरणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला घेतला आठ दिवस झाले बसवेश्वर जयंती निमित्त मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
श्री महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यासाठी लिंगायत समाज्याचे कार्यकर्ते मनोहर फल्ले ,विवेक फल्ले ,श्रीनिवास रिसवडे, महावीर कुंभार ,अण्णा खडके, अनिल कुमार वाले, सुरेश खडके, आनंदराव माळी, रुद्रपपा मडिवाळ, महादेव वाडेकर, दीपक खडके, राहुल फल्ले, स्वप्निल माळी ,विजय पट्टणशेट्टी, मोहन फल्ले, ओंकार उपासे ,संजय माळी, याच्यासह युवा गणेशोत्सव मंडळ, बसवेश्वर आदर्श केला क्रीडा मंडळ ,अक्का महादेव महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.









