निपाणी : प्रतिनिधी
निपाणीचे माजी आमदार काका पाटील यांचे मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या दीड महिन्यांपासून बेळगावातील केएलई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाटील यांनी तीनवेळा निपाणी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.काकांच्या काळम्मावाडी करारामुळे निपाणी भागात हरितक्रांती झाली.चार दशकांपासून निपाणीच्या राजकीय पटलावर ते केंद्रस्थानी राहिले. प्रदीर्घ आजारामुळे बेळगावात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाने समर्थक, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.









