खानापूर : माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी येथील नगरपंचायतीच्या सफाई कामगारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना मेडिकल किटचे वितरण करण्यात आले. तसेच येथील सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले. यावेळी अॅड. आय. आर. घाडी यांनी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. सध्या तालुक्याच्या विकासात कार्यसम्राज्ञीची उणीव भासत असल्याचे सांगून तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्यासारख्या नेतृत्वाची तालुक्याला प्रकर्षाने गरज भासत असल्याचे सांगून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, जॅकी फर्नांडिस, यशवंत बिरजे, चंबाण्णा होसमनी, लक्ष्मण मादार, अनिता दंडगल, प्रमोद सुतार, गुड्डुसाब टेकडी यांची शुभेच्छा देणारी भाषणे झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते नगरसेवक तोईद चांदकन्नावर, सूर्यकांत कुलकर्णी, साईश सुतार, संतोष हंजी, सुनील हंजी, इसाक पठाण, महावीर गंदिगवाड, श्रीकांत देसाई, दत्ता बिडकर, विनायक मुतगेकर, बेनी पिंटो, मंजुनाथ गोदगेरी, वैष्णवी पाटील, सावित्री मादार, आशा हलगेकर, दीपा पाटील, दीपाश्री पाटील, अंजली ठोंबरे, वैशाली अगसर, अरुणा मळबण्णावर, गीता अंबडगट्टी, सद्दाम बडेघर, मधू कवळेकर, अंजिक्य जाधव, मुबारक कित्तूर यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे अभिष्टचिंतन करणारी तसेच त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देणारी भाषणे कार्यकर्त्यांनी केली. तसेच तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कायम प्रयत्नशील राहावे, अशा भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.









