सावंतवाडी । प्रतिनिधी
देवगडच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान पाणीपुरवठा सभापती प्रणाली माने यांचे पती संशयित मिलिंद माने (४८ ) यांना सावंतवाडी पोलिसांनी मंगळवारी रात्री देवगड येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे असे सावंतवाडी पोलिसांनी सांगितले. दरम्यान,माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांच्या मुलाला अंतरिम अटकपूर्व जामीन नुकताच सिंधुदुर्गनगरी न्यायालयाने मंजूर केला असून सौ. प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण लागत असून पोलीस तपासानंतर अनेक बाबींचा उलगडा होणार आहे.









