सावंतवाडी : प्रतिनिधी
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी ठिकठिकाणी नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन दुर्गा देवीचे दर्शन घेतले. सावंतवाडी ,वेंगुर्ला तालुक्यात त्यांनी भेटी दिल्या. .विशेष म्हणजे त्यांच्यासोबत माजी नगरसेवक उदय नाईक, परिमल नाईक तसेच अजय गोंदावळे सहभागी झाले होते. तळवडे येथे पूर्वी देवीच्या नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी मंडळाचे राजाराम गावडे ,विकास गावडे यांनी त्यांचे स्वागत केले. परब यांनी आता ठिकठिकाणी जोरदार भेटीगाठी सुरू केल्या आहेत.









