Former Mayor Sanju Parab inspected the pothole filling work
नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकास कामांची माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली. मिलाग्रिस हायस्कूल शेजारी तहसिलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाची व गटार योजनेच्या कामाची पाहणी केली.
दरम्यान नगर परिषदेचे अधिकारी व ठेकेदार यांना कामाच्या दर्जाबाबत सूचना केल्या. यावेळी जिल्हा भाजपा युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, सावंतवाडी शहर मंडल सरचिटणीस विनोद सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, अथर्व सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









