पणजी /प्रतिनिधी
पणजी चे माजी महापौर रुदेश विनायक चोडणकर यांचे शुक्रवारी दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते 52 वर्षांचे होते .अंत्यसंस्कार दुपारनंतर चोडण येथील स्मशानभूमीत करण्यात आले. रुदेश मळा पणजी येथून पणजी नगरपालिका व नंतर महापालिकेवर दोन वेळा विजयी झाले होते. माजी मंत्री विनायक चोडण्कर यांचे पुत्र होते .त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ,तीन बहिणी न् इतर नातेवईक असा परिवार आहे .रुदेश चोडणकर हे अगोदर काँग्रेस पक्षात होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची उमेदवारी घेऊन मये मतदार संघातून काही वर्षांपूर्वी निवडणूक लढवली होती ,मात्र त्यांना तिथे अपयश आले.गेले काही दिवस ते आजारी होते व इस्पितळात उपचार चालू होते .शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले . रूदेश हे बाबूश मोन्स?रात यांचेही यापूर्वी कार्यकर्ते होते. त्यांचा पार्थिव देह मला येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी दोन तासांत करिता ठेवण्यात आला त्यानंतर दुपारी चोडण येथे नेण्यात आले आणि तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पणजी चे आमदार व मंत्री बाबूश मोन्स?रात यांनी पणजी येथील चोडणकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनाआदरांजली वाहिली. तसेच माजी महापौर उदय मडकईकर यांनीदेखील आदरांजली वाहिली.









