Kolhapur News : कोल्हापूरचे माजी महापौर व कोल्हापूर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे आज निधन झाले. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 1 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेचे 35 वर्ष नगरसेवक होते. ते उत्तम फुटबॉलपटूही होते.









