प्रतिनिधी/ बेळगाव
स्वामी विवेकानंद कॉलनी, टिळकवाडी येथील रहिवासी, उद्योजक, माजी महापौर, म. ए. समितीचे नेते गोविंद महादेव राऊत (वय 79) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
गोविंद राऊत हे मूळचे पिरनवाडीचे. सध्या अनगोळ सी स्कीम (मँगो मिडोजसमोर) येथे त्यांचे वास्तव्य होते. रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता अनगोळ येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे, असे कुटुंबीयांनी सांगितले. स्वामी विवेकानंद विश्वस्त गणेश मंदिराचे माजी अध्यक्ष, बेळगाव इंडस्ट्रीयल मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक, सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष अशा विविध संस्थांवर त्यांनी काम केले आहे.









