गुजरातच्या न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
म्हटले आहे. संजीव भट्ट हे दीर्घकाळापासून तुरुंगात कैद आहेत. संबंधित निर्णय पोरबंदरच्या एका न्यायालयाने दिला आहे. संजीव भट्ट हे पोरबंदरचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना एका इसमाचा कोठडीत मृत्यू झाला होता. प्रतिज्ञापत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित इसमाचा छळ करण्यात आला होता असा आरोप होता.
भट्ट यांना यापूर्वी जामनगरमध्ये 1990 च्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी आजीवन कारावास आणि राजस्थानच्या एका वकिलाला गोवण्यासाठी अमली पदार्थ पेरण्याशी संबंधित 1996 च्या प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भट्ट यांनी 2002 साली सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर गुजरातमध्ये दंगली घडवून आणल्याचा आरोप केला होता. परंतु विशेष तपास पथकाने हे आरोप फेटाळून लावले होते. भट्ट यांना 2011 मध्ये निलंबित करण्यात आले होते. तर ऑगस्ट 2015 मध्ये गृह मंत्रालयाने अनधिकृत अनुपस्थितीसाठी त्यांना बडतर्फ केले होते.
संजीव भट्ट याचबरोबर तीस्ता सेटलवाड आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर.बी. श्रीकुमार यांच्यासोबत मिळुन गुजरातच्या दंगलीशी संबंधित खोटे पुरावे तयार करण्याप्रकरणी ही आरोपी आहेत.









