मडगाव : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अँथनी रिबेलो यांचे काल सकाळी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. फुटबॉलमध्ये आपल्या जबरदस्त बचावासाठी ते प्रसिद्ध होते. आल्या खेळाची सुरूवात कुडतरी जिमखानाकडून खेळण्यास सुरूवात केल्यानंतर त्यानी आपल्या प्रोफेशनल फुटबॉलची सुरूवात पानवेल स्पोर्ट्स क्लबकडून खेळून सुरूवात केली.त्यानंतर अँथनी रिबेलो मांडवी शिपयार्ड स्पोर्ट्स क्लब व नंतर 1977 ते 1987 अशी दहा वर्षे साळगावकर फुटबॉल क्लबला खेळले. 1982 मध्ये रिबेलोने कोरियातील प्रेसिडेंट चषक तसेच मलेशियात झालेल्या मर्डेका कपमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले. 1987 मध्ये घुडग्याच्या दुखापतीमुळे त्यांनी स्पर्धात्मक फुटबॉलला अलविदा केले. साळगावकरच्या सेवेत असलेले रिबेलोने त्यानंतर कुवेतला होते.
Previous Articleडॉ. एम. डी. दीक्षित शनिवारी हृदयरोग तपासणीसाठी गोव्यात उपलब्ध
Next Article ‘अटलसेतू बंद’मुळे वाहनचालकांना मनस्ताप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









