मुंबईः भारताचे माजी सलामीवीर आणि तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये क्युरेटरचे काम पाहणारे सुधीर नाईक यांचे बुधवारी निधन झाले. 7 दिवसांपूर्वी आजारी पडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी 1974 साली भारताकडून 3 कसोटी व दोन वन डे सामने खेळले होते. स्फोटक सलामीवीर अशी त्यांची ख्याती होती आणि 1974 च्या इंग्लंड दौऱयावर ते टीम इंडियाच्या सलामीच्या जागेसाठी दावेदार होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 40.55 च्या सरासरीने 730 धावा केल्या होत्या. प्रथमश्रेणी क्रिकेटच्या कामगिरीमुळे त्यांना एजबॅस्टन कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले होते. त्या कसोटी त्यांच्या अखेरच्या ठरल्या. मुंबई संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी 40.10 च्या सरासरीने 2687 धावा केल्या होत्या आणि 1973-74 मध्ये बडोदाविरुद्ध नाबाद 200 धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने 1970-71 मध्ये रणजी करंडक जिंकला. मुंबई युनिव्हर्सिटी आणि टाटा ऑईल मिल्स या संघांकडूनही ते खेळले. नॅशनल क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षक असताना त्यांच्या हाताखाली झहीर खान, वासिम जाफर, राजेश पवार, राजू सुतार, पारस म्हाम्ब्रे आदी खेळाडू घडले. 2005 मध्ये त्यांच्यावर वानखेडे स्टेडियमच्या क्युरेटरची जबाबदारी सोपवली गेली. 2011 च्या वर्ल्ड कप फायनलची खेळपट्टी नाईक यांच्या देखरेखीखाली तयार केली गेली होती.
Previous Articleकोलकाता नाईट रायडर्सचा पहिला विजय
Next Article शाहीनबाग ते केरळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









