म्हासुर्ली / वार्ताहर
म्हासुर्ली(ता.राधानगरी )येथील ग्रामपंचायत सरपंच सौ.मीनाताई भिमराव कांबळे यांनी एप्रिल २०२१ मधील मासिक सभा हेतूपूर्वक घेतली नाही.याबाबत इतर सर्व सदस्यांनी आक्षेप घेत गटविकास अधिकारी राधानगरी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती.मात्र सदर तक्रारी बाबत योग्य ती कारवाई होण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल होत असल्याने येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
धामणी खोऱ्यातील एक संवेदनशील व बाजारपेठेचे गाव असलेल्या म्हासुर्ली ग्रामपंचायतची सदस्य संख्या ११ आहे.येथील ग्रामपंचायतीची सन २०२० -२१ मध्ये पंचवार्षिक निवडणूक असून सरपंचपद मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने मीनाताई कांबळे यांची सरपंचपदी निवड झाली.पुढे ग्रामपंचायत कामकाजात त्यांच्या कुटुंबियांचा हस्तक्षेप वाढत गेल्याने सरपंच व इतर सदस्य यांच्यात नाराजी नाट्य सुरु झाले.परिणामी गावच्या विकासाला खिळ बसत गेली.यातूनच पुढे कुरघोडीचे राजकारण होवू लागले.आणि गायरान अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुण ग्रामपंचापत सदस्य असलेल्या बाबुराव कांबळे यांचे सदस्यपद अपात्र ठरवण्यात आले.
शासन नियमानुसार आपण अपात्र ठरलो.मग सरपंच यांच्यावर कारवाई होणेस प्रशासनाकडून का टाळाटाळ होत आहे.असा सवाल बाबुराव कांबळे यांनी व्यक्तत केला असून गावच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेणे हे अनिवार्य असताना, पूर्वक एप्रिल २०२१ ची मासिक सभा सरपंच यांनी घेतली नाही.याबाबत सर्वच सदस्यांकडून आक्षेप घेत कारवाईबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
ग्रामपंचायत १९५८ कलम ३९ नुसार सरपंच हे कारवाईस पात्र आहेत.त्यासंदर्भात तक्रार देवूनही जाणीव पूर्वक कारवाई झालेली नाही.कारवाईच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल या प्रतिक्षेत आजवर होतो.पण त्यात अधिकच दिरंगाई होत असल्याचे ग्रा पं सदस्यांचे म्हणणे असून २६ जानेवारी पर्यंत प्रशासनाकडून कारवाईची वाट पाहणार आहे अन्यथा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बाबुराव सदाशिव कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









